मंदीत संधी...भारतीय रेल्वेत 35 हजार जागांची भरती


मंदीत संधी...भारतीय रेल्वेत 35 हजार जागांची भरती

नवी दिल्ली : करोना काळात रोजगाराचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.  याच दरम्यान सरकारी नोकरीची सुवर्ण संधी चालून आली आहे.  भारतीय रेल्वेच्या आरआरबी एनटीपीसी 2020 अंतर्गत ही नोकर भरती प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही संधी पदवीधर असणाऱ्या आणि नसणाऱ्याही तरुणांसाठी आहे.  रेल्वे भरती बोर्ड आणि नॉन टेक्निकल पॉप्यूलर कॅटेगरीअंतर्गत 35 हजार 208 जागांसाठी नोकरभरती होणार आहे. यामध्ये ऑनलाइन परीक्षा द्यावी लागणाार आहे.
एकूण जागांपैकी 24 हजार 605 जागा पदवीधर तर उर्वरित 10 हजार 603 जागा नॉन पदवीधर तरूणांसाठी आहेत. ही परीक्षा घेण्याकरता रेल्वे भरती बोर्डाने एजन्सी नियुक्त केली आहे.
आरआरबी एनआरपीसी विभागातील क्लार्क कम टायपिस्ट, अकाऊंटस क्लार्क कम टायपिस्ट, टाईम कीपर, ट्रेन्स क्लार्क, कमर्शियल कम तिकिट क्लार्क, ट्रॅफिक असिस्टंट, गुड्स गार्ड, कमर्शियल अ‍ॅप्रेंटिस आणि स्टेशन मास्टर या पदांच्या भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा रेल्वेच्या विविध झोनसाठी घेण्यात येईल. रिक्त जागा, अर्ज प्रक्रिया आणि पात्रता याबद्दल अधिक माहिती  रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post