नगर जिल्ह्यातील 'या' शहरात 8 दिवसांचा लॉकडाऊन?, मंत्र्यांनी केले सुतोवाच

नगर जिल्ह्यातील 'या' शहरात 8 दिवसांचा लॉकडाऊन?,
मंत्र्यांनी केले सुतोवाच

नगर - नगर जिल्ह्यात करोनाचा प्रादुर्भाव प्रचंड वेगाने वाढत आहे. दोन दिवसात तब्बल 1700 हुन अधिक रुग्ण आढळल्याने जिल्हा हादरला आहे. यापार्श्वभूमीवर पुन्हा एकदा जिल्ह्यात लॉकडाऊनची चर्चा सुरु झाली आहे. राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांनी राहुरी शहरात आठ दिवसांच्या लॉकडाऊनचे सूतोवाच केले आहे. तनपुरे यांनी ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे.

"कोरोना संक्रमणाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता खबरदारी म्हणून राहुरी शहरातील व्यापारी प्रतिनिधी, नगरसेवक व इतर सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी यांना विश्वासात घेऊन किमान आठवडाभराचा लॉकडाऊनचा निर्णय घेण्याचा विचार आहे."

असे ट्विट तनपुरे यांनी केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post