राज्यात मोठं राजकारण होणार?

संजय राऊत व देवेंद्र फडणवीस यांच्यातील गुप्त बैठकीची राजकीय वर्तुळात चर्चा
राज्यात मोठं राजकारण होणार?


मुंबई :  शिवसेना खासदार संजय राऊत आणि भाजप नेते,  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट झाली. मुंबईतील हयात हॉटेलमध्ये ही भेट झाल्याचं सांगण्यात येत आहे. आज दुपारी दीड ते साडेतीन असे तब्बल दोन तास दोघांमध्ये गुफ्तगु झाले असून या भेटीच्या वृत्तामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. एकमेकांना पाण्यात पाहणारे शिवसेना व भाजप मध्ये कोणती खिचडी शिजतेय याबाबत तर्क लढवले जात आहेत. खाजगी वृत्तवाहिन्यांनी या भेटीचे वृत्त दिले आहे.

दरम्यान, राऊत यांनी फडणवीसांशी भेट झाल्याचा वृत्ताचा इन्कार केला असला तरी पुढच्या आठवड्यात दैनिक ‘सामना’मध्ये फडणवीस यांची मुलाखत छापून येणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं, असही टिव्हि 9 च्या वृत्तात म्हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post