इच्छुक अर्जदारांना कर्जप्रस्ताव पाठविण्याचे
ओबीसी महामंडळाचे आवाहन
अहमदनगर, दि.२८- महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत सन 2020-21 मध्ये अहमदनगर जिल्ह्यास विशेष घटक योजनांसाठी 42 व बीजभांडवल योजनेसाठी 47 कर्जप्रकरणाचे उद्दिष्ट दिलेले आहे. अनुसूचित जातीतील इच्छूक अर्जदाराकडुन कर्जप्रस्ताव मागविण्यात येत आहेत.
विशेष घटक योजना व बीजभांडवल योजनेचा फायदा घेण्यासाठी अर्जदार हा महार, नवबौध्द, बौध्द, खाटीक, बुरूड, मेहतर, वाल्मीकी समाजातील असावा. अर्जदाराने अथवा अर्जदारांच्या पती /पत्नीने यापुर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेलेला नसावा. तसेच कर्जप्रस्तावासोबत जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, रेशनकार्ड, मतदान, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो, कोटेशन, आवश्कतेनुसार प्रकल्प अहवाल, वाहनाकरिता लायसन्स, जामीनदाराचे कागदपत्रे शपथपत्रे, जागेचा पुरावा, लाईटबील, टॅक्सपावती भाडेकरारनामा किंवा उतारा व्यवसायाचा ना हरकत दाखला किंवा शॉपअॅक्ट लायसन्स व शाळेचा दाखला जोडणे आवश्यक आहे. महामंडळाच्या विहित नमुन्यातील अर्ज दिनांक 26 ऑक्टोबर 2020 पर्यंत कार्यालयीन वेळेत सकाळी 9-30 ते सायंकाळी 6-30 वाजेपर्यंत उपलब्ध होतील. कर्ज प्रकरणे स्विकारतांना तालुक्यातील अर्जदारांना प्राधान्य देण्यात येईल. अधिक माहितीसाठी, जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ, 123 वी, हालिमा मेन्शन, सर्जेपुरा, अहमदनगर येथे संपर्क साधावा असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक सौ.वाय. एच.काकडे यांनी केले आहे. ***
Post a Comment