माध्य. शाळा शिक्षकेतर संघाच्या अध्यक्षपदी नानासाहेब जोशी तर सचिवपदी विजय मोहिते

अहमदनगर शहर माध्यशाळा शिक्षकेतर संघाच्या
अध्यक्षपदी नानासाहेब जोशी तर सचिवपदी विजय मोहिते


     नगर - अहमदनगर शहर माध्यशाळा शिक्षकेतर संघाची सर्वसाधारण सभा भाऊसाहेब काकडे यांचे अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती.  या सभेत विविध विषयांवर चर्चा होऊन नवीन कार्यकारीणी जाहिर करण्यात आली तीपुढील प्रमाणे :  अध्यक्ष - नानासाहेब जोशी (श्री समर्थ विद्या मंदिरसांगळेगल्ली),  सचिव - विजय मोहिते (लक्ष्मीबाई भाऊराव पाटिल विद्यालय),  उपाध्यक्ष - मनेष हिरणवाळे (दादा चौधरी विद्यालय), हिशोब तपासणीस - अनिरुध्द देशमुख - (भाई सथ्था नाईट हायस्कूल),  खजिनदार - योगेश आगवान (जिजामाता माध्य.विद्यालय), कार्यकारिणी सदस्य - ठाकुरदास परदेशी (पंडीत नेहरु हिंदी विद्यालय), गणेश राजपुरे (सीताराम सारडा विद्यालय), सुखदेव शिंदे (डॉन बॉक्सो विद्यालय), गिरिष मंडलिक (क्लेरा ब्रुस गर्ल्स हायस्कूलयांची  निवड करण्यात आली.
     यावेळी राज्य शिक्षकेतर महामंडळाचे पुणे विभागीय सचिव गोवर्धन पांडुळेजिल्हा सचिव भानुदास दळवीहिशोब तपासणीस किशोर मुथ्थाकार्य.सदस्य देविदास हुलगुंडे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post