'हा' तर शिवसेनेचा राजकीय व्यभिचार, राऊत-फडणवीस भेटीवर कॉंग्रेस नेत्याची प्रतिक्रिया
मुंबई _ काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी या भेटीवरून शिवसेनेवर निशाणा साधला आहे. ही भेट म्हणजे शिवसेनेचा राजकीय व्याभिचार असल्याचं संजय निरुपम यांनी म्हटलं आहे. एवढंच नाही तर शिवसेना ही काँग्रेसची फसवणूक करत आहे, असा गंभीर आरोप देखील निरुपम यांनी केला आहे.
संजय निरुपम यांनी सांगितलं की, 'केंद्र सरकारनं मांडलेल्या कृषी विधेयकाला संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं कडाडून विरोध केला. मात्र, शिवसेना पक्ष प्रमुख आणि शिवसेनेच्या मंत्र्यांनी कृषी विधेयकाला पाठिंबा दिला. शिवसेनाची भूमिका कायम दिशाभूल करणारी आहे. काँग्रेसने आपला विचारधारा, धर्म, व्यवहार सर्वकाही सोडून सत्ता स्थापनेत शिवसेनेला सहकार्य केले. मात्र, हिच शिवसेना आता काँग्रेसची फसवणूक करते आहे.
Post a Comment