नवरात्र उत्सवाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय, मार्गदर्शक सूचना जारी

नवरात्र उत्सवाबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय


मुंबई : करोनाच्या पार्श्र्वभूमीवर    यंदा नवरात्रौत्सव, दुर्गापूजा आणि दसरा सण कसा साजरा करावा, याबाबत राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. याबाबत राज्य सरकारना मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहे.
सार्वजनिक नवरात्री उत्सव मूर्ती 4 फूटापेक्षा तर घरगुती 2 फूटापेक्षा मोठी नसावी, देवी मिरवणूक काढता येणार नाही, विसर्जन नियमावली पाळावी, मंडपस्थळी सॅनिटाझयरचा वापर करावा लागेल. दर्शन रांगेत सोशल डिस्टंसिंगचा नियम पाळावा लागेल, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

विशेष म्हणजे यंदा गरबा, दाांडिया कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर धार्मिक कार्यक्रमांच गर्दी न करता आयोजन करावे. 
दसऱ्याच्या दिवशी मात्र रावण दहन करता येणार आहे. मात्र, या कार्यक्रमाला गर्दी होणार नाही. सुरक्षित सामाजिक अंतर नियमावली पाळली जाणे गरजेचं असल्याचं म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post