ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा कोयता चालणार नाही...

ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा कोयता चालणार नाही...
माजी मंत्री पंकजा मुंडे यांचा इशारा
लवादाच्या बाबत अत्यंत अनुभवी खा.शरद पवार यांचे मार्गदर्शन घ्यावे

नगर-ऊसतोड मजुरांना सन्मानजनक वाढ द्या अन्यथा कोयता चालणार नाही, असा इशारा देत माजी मंत्री पंकजा मुंडे यांनी करार 3 वर्षाचाच होईल, असेही स्पष्ट केले आहे. कोविडच्या धरतीवर मजुरांना विमा कवच द्या. सरकारने व कारखान्याने ही जवाबदारी घ्यावी अशी मागणीही मुंडे यांनी केली आहे. मुंडे यांनी ट्विटरवर ऊसतोड मजुरांच्या मागण्यांबाबत भूमिका मांडली आहे.
सरकार पातळीवरील विषय चर्चा करण्यासाठी एक आणि भाववाढ व करोना सुरक्षा यावर चर्चा करणारी एक अश्या दोन कमिटी साखर संघाने कराव्या, साखर संघाचे अध्यक्ष दांडेगावकर जी यांनी त्या कमिटींचे अध्यक्ष असावे. या दोन्ही कमिटींनी त्यांचे म्हणणे लवादा समोर मांडावे व चर्चा करावी.
ऊसतोड कामगार महामंडळाकडे असणारे विषय हाताळण्यासाठी ना. धनंजय मुंडेनाही बैठकीला बोलवावे व जवाबदारी निश्चित करावी. सरकार पातळीवर आणखी मंत्री महोदय उदा.आरोग्य मंत्री, कामगार मंत्री, महिला व बाल कल्याण यांना ही बोलवावे. आणि कमिटीच्या सूचना लवादासमोर आणाव्या. निर्णय लवादाने घ्यावे अश्या सूचना साखरसंघाच्या बैठकीत केल्याची माहिती मुंडे यांनी दिली.
लवादाच्या बाबत अत्यंत अनुभवी सन्माननीय खा.शरद पवार साहेब यांचे मार्गदर्शन घ्यावे. संप हा मजुरांच्या हक्कासाठी आहे कोणाचीही राजकीय पोळी भाजण्यासाठी नाही. माझे ऊसतोड कामगार हे राजकीय प्यादे नाहीत, अशी सडेतोड भूमिका मुंडे यांनी मांडली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post