जिल्हा परिषदेत ठेकेदारांकडून मुद्रांकाची 'बनवाबनवी' !

जिल्हा परिषदेत ठेकेदारांकडून मुद्रांकाची बनवाबनवी !
एकाच मुंद्रांकाचा अनेक टेंडरसाठी वापर, चौकशी करून फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी
ॲड.श्याम आसावा यांनी केली पोलखोलनगर: संपुर्ण देश अजुनही काही वर्षापूर्वी घडलेल्या तेलगी मुद्रांक घोटाळा विसरलेला नाही. त्याच प्रमाणे अहमदनगर जिल्यातील बांधकाम ठेकेदारांनी मुद्रांक घोटाळा केलेला आहे. फरक इतकाच की तेलगी प्रकरणात बनावट मुद्रांक छापण्यात आले तर या मुद्रांक घोटाळ्यात एक कामासाठी घेतलेला मुद्रांक अनेक कामासाठी वापरुन शासनाचा मुदांक बुडवून शासनाला गंडा घालण्यात आलेला आहे, असा आरोप ॲड.श्याम आसावा यांनी केला आहे.
याबाबत जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच प्रशासनाला दिलेल्या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,
सार्वजनिक बांधकाम विभागाचे मार्फत सार्वजनिक प्रयोजनाची ऊदा. रस्ते, पुल, शाळा ई बांधकामे केली जातात. बहुतांशी कामांचे टेंडर काढुन बांधकाम ठेकेदारांकडून हि कामे करवुन घेतली जातात.
कामाचे टेंडर निघाल्यानंतर त्यात भाग घेणारया ठेकेदाराने त्या टेंडर बाबत रूपये 500/-च्या स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक असते. प्रत्येक स्वतंत्र टेंडर मध्ये भाग घेण्यासाठी स्वतंत्र स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र देणे आवश्यक आहे.
या स्टॅम्प वर कामाचे नाव नमुद असणे आवश्यक आहे. कामाचे नाव वगळता सर्वच टेंडर मधील या प्रतिज्ञापत्राचा मजकुर सारखाच आहे. आता टेंडर प्रक्रिया आॅनलाईन होत असल्याने टेंडर मध्ये भाग घेणारया ठेकेदाराने टेंडर संबंधी कागदपत्रे स्कॅन करून बेबसाईटवर अपलोड करण्याची पध्दत आहे.
याचाच गैरफायदा घेत अनेक ठेकेदार वेगवेगळ्या टेंडर मध्ये एकच मुद्रांक वापरत आहे. मुळ प्रतिज्ञापत्र मधील कामाचे नाव कोरे ठेवायचे व ज्या कामाच्या टेंडर असेल तेथे या मुद्रांक वर पेन्सिल ने नाव टाकुन स्कॅन करायचे असे वारंवार केले जाते कींवा मुळ प्रतिज्ञापात्राची झेराॅक्स काढुन त्या कोरया जागेत कामाचे नाव टाकुन ते स्कॅन करायचे. शिवाय मुळ प्रतिज्ञापत्रावर प्रतिज्ञापत्र कोणत्या तारखेला, वारला व कोणत्या गावी केला हे वर प्रमाणे चलाखी करायची असल्याने नमुदच करायचे नाही म्हणजे प्रश्नच येत नाही. अशाच पद्धतीने एकच मुद्रांकावरील प्रतिज्ञापत्र त्यात हेरफार करुन शासनाचा महसुल बुडविण्याचा उद्देशाने वापरुन शासनाची फसवणूक करत गंडा घातला जात आहे.
ठेकेदार आपसात रिंग करून ठेके मिळवतात अशी नेहमी चर्चा असते. या टेंडर ची कागदपत्रे तपासली तर हेही लक्षात येईल की कसे वेगवेगळ्या ठिकाणी राहणारया ठेकेदारांना एकाच मुद्रांक विक्रेता कडुन एकाच तारखेला, सलग नंबरचे मुद्रांक मिळतात, टाईपिंग एकच फाॅंट, अलाईनमेंट सारखीच व ज्या जागा गाळलेल्या ठेवायच्यात (वर नमुद केल्या प्रमाणे एकच मुद्रांक वेगवेगळ्या कामासाठी वापरण्याकरीता) ते सर्व सारखेच. हा योगायोग असु शकत नाही.
खर तर एकच प्रतिज्ञापत्र किती दिवस वैध असते याचा वेळोवेळी कालमर्यादा आहे परंतु भ्रष्ट ठेकेदारांना ती लागु नाही व अनेक महिने, वर्ष हा मुद्रांक वापरला जात आहे. खर तर या कारणामुळे तसेच प्रतिज्ञापत्रात कामाचे नाव नसेल तर कागदपत्रे अपुर्ण म्हणून ठेकेदार प्रक्रियात अपात्र ठरविला जाणे आवश्यक असतांना छाननी करणारे या ठेकेदारांवर मेहेरबान होत असल्याने हे ठेकेदार अपात्र ठरत नाही उलट यांनाच ठेका मिळतो, हे आश्चर्यजनक आहे.
आम्ही जे उदाहरणे दिली ती या गैरव्यवहार  व भ्रष्टाचाराच्या हिमनगाचे टोक आहे. खोलात जावुन तपासणी झाली तर अनेक जणांनी शासनाला गंडा घालण्याच्या उद्देशाने या प्रकारे कागदांमध्ये हेरफार करत, खोटी माहिती देत फसविले आहे. यास आपल्याही कार्यालयातील काही जण सामील असल्यानेच आजपावेतो हा प्रकार उघडकीस आलेला नाही.
खर तर हे ठेकेदार मुळात टेंडर प्रक्रीयेत सामिल होतांनाच जर शासनाला मुद्रांक न भरता चुना लावण्यासाठी अशी गैरकृत्य करत असतील तर त्यांच्या प्राप्त टेंडर च्या कामातील गुणवत्तेची कल्पना न केलेली बरी.
काही दिवसापूर्वी एक ठेकेदाराने एक टि डि एस सर्टीफिकेट अनेक कामासाठी वापरल्याचा प्रकार उघडकीस आला होता. मोठा गाजा वाजा झाल्यानंतरच नाईलाजाने त्यावर पुढे कारवाई झाली.  याही प्रकरणात आपली इच्छा शक्ती महत्वाची आहे. आपणास पुरावे पाहिजे असेल तर  मौजे ममदापुर (23/09/2020), पुणतांबा (12/06/2020) येथील शाळा खोल्या बांधकाम टेंडर प्रक्रिया मधील ठेकेदारांनी दिलेली प्रतिज्ञापत्र तपासावीत.
तरी आपणास विनंती की मुद्रांक घोटाळा करुन शासनाला गंडा घालणाऱ्या ठेकेदारांची चौकशी होवुन त्यांच्यावर तातडीने फौजदारी गुन्हे नोंदविण्यात यावेत तसेच त्यांना काळ्या यादीत टाकण्यात यावे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post