एक तर जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री म्हणून नेमा, नाही तर मला एक दिवसाचा पालकमंत्री बनवा

एक तर जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री म्हणून नेमा, नाही तर मला एक दिवसाचा पालकमंत्री बनवा

मनसेच्या सुमित वर्मा यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


अहमदनगर- जिल्ह्यात सध्या कोरोनाचा कहर दिवसेंदिवस वाढत चालला आहे. ज्या प्रकारे कोरोना
प्रतिबंधात्मक उपाययोजना हव्या होत्या त्या प्रकारे काहीच काम होत नाही याचा दिवसेंदिवस विरोध
होत असताना देखील जिल्ह्याचे मायबाप म्हणून आपण नेमून दिलेले पालकमंत्री  हसन मुश्रीफ यांना
कोणत्याही प्रकारचं गांभीर्य असलेलं दिसत नाही. त्यामुळे एक तर जिल्ह्यातील आमदार पालकमंत्री म्हणून नेमा, अन्यथा मला एक दिवसाचा पालकमंत्री म्हणून संधी द्या , अशी मागणी मनसेचे सुमित वर्मा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कडे केली आहे.
मुख्यमंत्री ठाकरे यांना दिलेल्या निवेदनात वर्मा यांनी म्हटले आहे की.
आत्ता पर्यंत जिल्ह्यातील सर्वच पक्ष आणि संघटनांनी कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना करा या संबंधी निवेदने, आंदोलने करून झाली.पण ना प्रशासनाला जाग येते ना पालकमंत्र्यांना. एकतर या जिल्ह्याला आपलं समजणारा पालकमंत्री आपण द्यायला हवा होता पण आमचं दुर्दैव आम्हाला हे मिळाले. जिल्ह्यासह शहराची परिस्थिती अत्यंत बिकट आहे. रुग्णांना वेळेत बेड मिळत नाही. व्हेंटीलेटरची कमतरता, खासगी रुग्णालय काही ठरावीक रक्कम भरल्याशिवाय रुग्णांना दाखल करून घेत नाही अव्वा च्या सव्वा बिलं काढली जाताय, महानगरपालिकेकडे कोणत्याही कामासाठी पैसा उपलब्ध नाही, रस्ते खराब, आरोग्य यंत्रणा पूर्णपणे खोळंबली, महावितरण ने तर वाढीव वीजबिलांचा कहरच केलाय, नालेसफाई ची अर्धवट कामं यासारखी सर्व असंख्य अडचणी सध्या नगरकर नरकयातना भोगतो आहे. एकतर लोकप्रतिनिधी तुमचाच सत्तारूढ पक्षांपैकी एक, पालकमंत्री तुमचेच, २ मंत्री तुमचेच तरी शहरासह जिल्ह्यात पूर्णवेळ या अडचणी आहे. आमच्याकडे यातून मार्ग काढण्यासाठी काही उपाययोजना आहेत म्हणून आपल्याला
एक मागणी करत आहे. ज्या प्रकारे एका चित्रपट मध्ये अभिनेता अनिल कपूरला एका दिवसाचा मुख्यमंत्री
बनवल्याची दृश्य दाखवली गेली त्या प्रकारे एक संधी मला द्या मला एक दिवसाचा पालकमंत्री करा म्हणजे
किमान जनतेच्या मनातील कामं तरी आम्हाला कोणत्याही कारण न देता करता येतील. साहेब नगरकरांचा
भावना विचारात घ्या, कारण खूप मानसिक तणावातून लोक जगात आहेत. पालकमंत्री आले १ तास
थांबले अन गेले यात काय वेळ ते नगरकरांना देत आहेत? किती व्यापाऱ्यांना, डॉक्टरांना, विद्यार्थ्यांना,
सर्वसामान्यांना भेटले? कोणत्याही प्रकारची जबाबदारी निभावताना पालकमंत्री दिसत नाही. साहेब एकतर
जिल्ह्यातील एखाद्या आमदारांना पालकमंत्री पदी नियुक्त करा अन्यथा मला एक दिवसाचा पालकमंत्री करा
हि आपणास नम्र विनंती. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post