विधानपरिषद उपसभापतीपदासाठी शिवसेना व भाजप आमनेसामने

विधानपरिषद उपसभापतीपदासाठी शिवसेना व भाजप आमनेसामने

मुंबई  : करोनाच्या पार्श्वभूमीवर फक्त दोन दिवसांचे विधिमंडळ अधिवेशन होत असून यात 8 सप्टेंबर रोजी विधानपरिषदेच्या उपसभापती पदासाठी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने आपला उमेदवार जाहीर केल्यानंतर भाजपनेही आपला उमेदवार रिंगणार उतरवला. महाविकास आघाडीकडून नीलम गोऱ्हे या मैदानात असणार आहेत, तर भाजपकडून त्यांना भाई गिरकर हे आव्हान देतील.
विधानपरिषद निवडणुकीत गैरहजर आमदारांना मतदान करण्याचा अधिकार द्यावा अशी मागणी भाजपच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबत विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी विधानपरिषद सभापतींना पत्र दिलं आहे. विधानपरिषदेत महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ असले तरी भाजपने उमेदवार दिल्याने निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post