राष्ट्रवादीच्या ''या' आमदाराची मालमत्ता जप्त करून विक्री करण्याची प्रक्रिया
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करताना ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केलीय . पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अनिल भोसले यांच्या मालकीच्या चार अलिशान गाड्या जप्त केल्या. त्याचबरोबर अनिल भोसलेंच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचं कामही पोलिसांकडून सुरु आहे.
ही मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्या अं तर्गत जप्त करून त्याची विक्री करून त्यातून उभी राहणारी रक्कम ठेवीदारांना देता येईल का याचा पोलीस विचार करीत आहेत. त्यासाठी पुणे पोलिसांकडून राज्य सरकारकडे परवानगी मागण्यात आलीय. अनिल भोसले हे शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक असताना बॅंकेतील रक्कम खातेदारांची बनावट नावं तयार करून अनिल भोसलेंनी स्वतः वापरल्याचा आरोप आहे .
राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानपरिषदेचे आमदार बनलेल्या अनिल भोसले यांचे 2017 च्या पुणे महापालिका निवडणुकीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वासोबत मतभेद झाले होते. अनिल भोसले यांच्या पत्नी रेश्मा भोसले या त्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या.
पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेचे संचालक म्हणून काम करताना ठेवीदारांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांची मालमत्ता जप्त करण्याची प्रक्रिया पुणे पोलिसांनी सुरु केलीय . पुणे पोलिसांनी चार दिवसांपूर्वी अनिल भोसले यांच्या मालकीच्या चार अलिशान गाड्या जप्त केल्या. त्याचबरोबर अनिल भोसलेंच्या वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या मालमत्तांची माहिती गोळा करण्याचं कामही पोलिसांकडून सुरु आहे.
ही मालमत्ता महाराष्ट्र ठेवीदार हितसंरक्षण कायद्या अं

Post a Comment