कंगनाविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा आक्षेप

कंगनाविरोधात 50 कोटींचा मानहानीचा दावा, मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा आक्षेप

सेवानिवृत्त पोलिस अधिकार्याची न्यायालयात याचिका


मुंबई : सुशांतसिंह राजपूत प्रकरणात मुंबई पोलीस आणि राज्य सरकारवर सोशल मीडियातून निशाणा साधणाऱ्या कंगना रणौत विरोधात 50 कोटींच्या मानहानीचा दावा करण्यात आला आहे.  मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल निवृत्त पोलीस अधिकारी प्रदीप लोणंदकर यांनी   फौजदारी आणि दिवाणी असे दोन्ही दावे न्यायालयात केले आहेत.

जनमानसांत असलेली मुंबई पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याबद्दल कंगनानं जाहीर माफी मागावी. तसेच या बेताल वक्तव्यांबाबद्दल तिनं नुकसानभरपाई म्हणून 50 कोटी रूपये पोलीस वेलफेअर फंडमध्ये जमा करावेत. अशी मागणी करत प्रदीप लोणंदकर या निवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तांनी ज्येष्ठ वकील मोहन जयकर यांच्यामार्फत ही याचिका कोर्टात दाखल केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post