वाघ की बिबट्या?...खर्डा किल्ला परिसरात दर्शन, नागरिकांमध्ये दहशत VIDEO

वाघ की बिबट्या?...खर्डा किल्ला परिसरात दर्शन, नागरिकांमध्ये दहशत VIDEO

खर्डा  (नासीर पठाण ):येथे किल्ला परिसरात पैठण पंढरपूर  पालखी मार्गावर जवळ तीन बिबटे की वाघ पाहताच नागरिकांची घबराट उडाली.
    येथून किल्ल्याच्या जवळून जाणाऱ्या पंढरपूर पालखी मार्गाच्या परिसरात नागरिकांना तीन वाघ की बिबट्या अशा संभ्रमात नागरिकास नजरेस पडले. प्रत्यक्ष पाहताच महिलांनी आरडाओरडा सुरू करताच त्यांनी धूम ठोकली. नागरिकांनी आवाज देऊन  परिसरातील नागरिकांना सावध केले. पाहिलेला  वाघच की बिबटया असे तर्कवितर्क  नागरिक काढून पळापळ होऊन सर्व नागरिक एकत्र जमा झाले. काहींनी गावाकडे पळ काढला .खर्डा शहराच्या जवळच लागून असलेल्या किल्ला परिसरात बिबट्याचे दर्शन नागरिकांना झाले.
     नुकतेच जामखेड तालुक्यातील नायगाव येथे बिबट्याने 3 शेळ्या, एक वासरू, एक वानर व दोन म्हशीचे रेडकू जखमी करून फस्त केले असल्यामुळे तालुक्यात सर्वत्र खळबळ उडाली होती. त्यातच शहराच्या लगतच शेतात तीन बिबटे पाहिल्यामुळे अजुन असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या तीन बिबट्यामुळे ग्रामस्थांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. शेतकऱ्यांमध्ये मोठी दहशत बसली आहे. रात्रीची वेळ असल्यामुळे हे बिबटे नसून किंवा वाघाच असावे असल्याचा अंदाज काही प्रत्यक्षदर्शींनी नागरिकांनी तर काही महिलांच्या सांगण्यात येते की ते वाघाच असावेत. परंतु काही नागरिक बिबटया असल्याचा अंदाज वर्तवतात.
        आपल्या शेतात काम करत असताना दिपाली उमेश कोरे, उमेश श्रीरंग कोरे , हनुमंत कोरे, तांन्हुबाई कोरे, श्रीहरी कोरे यांच्यासह दीपक दिलीप गायकवाड ,दिपाली दिलीप गायकवाड, ममता भीमराव घोडेराव, भीमा घोडेगाव ,मंगल प्रवीण जावळे, दीपक बोराडे यांच्या सह शेतात काम करणार्‍या नागरिकांनी पाहिल्याने गावाकडे पळ काढला.
     नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण आहे.प्रत्यक्षदर्शी पाहणाऱ्यांना सांगतात की हे चुकून आले असावे सैरावैरा पळत आहेत. परंतु काही प्रत्यक्षदर्शीनी पाणी पिताना त्यांना पाहिले.
    याबाबत ग्रामस्थांनी सरपंच संजय गोपाळघरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी तातडीने वन विभागाची संपर्क केला. ग्रामस्थांना सतर्क करण्यासाठी गावात रात्री उशिरा दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याचे आव्हान केले.
VIDEO

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post