सोने, मोबाईलसह 70 हजारांचा मुद्देमाल चोरणारा जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी

सोने, मोबाईलसह 70 हजारांचा मुद्देमाल चोरणारा जेरबंद, स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी


नगर - दि.18 ऑगस्ट  रोजी फिर्यादी सुमन दत्तु सोडनर, (वय ४५,रा, तरंगे वस्ती मांडवे ता.संगमनेर
जि.अहमदनगर ) या त्यांचे पती व मुलगा असे युटेक शुगर, विरेवाडी येथे सेंबरे यांचे मोकळया शेतात पाल टाकुन शेळया मेंढया बंदिस्त करून रात्री झोपले असता चार अज्ञात चोरटयांनी ७०००० रु. किंमतीचा मुद्देमाल त्यात सोन्याचे दागिने,मोबाईल व शेळी त्यांचे संमतीशिवाय चोरुन नेला होता. त्याबाबत फिर्यादी यांनी घारगांव पो.स्टे येथे दिलेल्या फिर्यादी वरुन घारगांव पो.स्टे.ला  गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदर गुन्हयाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेने पोनि दिलीप पवार यांच्या मार्गदर्शनाखाली केला.
यात सदर गुन्हा हा अविनाश भिकन विधाटे (रा.ताहाराबाद ता.राहुरी जि. अ.नगर) याने त्याचे साथिदारांसह केला असल्याची गोपनिय माहिती मिळाल्याने  पोहेकॉ दत्तात्रय हिंगडे,मनोज गोसावी, भागिनाथ पंचमुख,रविकिरण सोनटक्के,संदीप दरंदले,विनोद मासाळकर,योगेश सातपुते,विजय धनेधर,संभाजी कोतकर यांनी  आरोपी अविनाश भिकन विधाटे यास ताब्यात घेऊन चौकशी केली. त्याने  भोल्या ऊर्फ नितीन नानासाहेब विधाटे (रा.ताहाराबाद ता.राहुरी (फरार),  भगत ऊर्फ आकाश गोपिनाथ लाहुंडे (रा.ताहाराबाद ता.राहुरी (फरार) यांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली.
गुन्हयातील चोरी केलेले सोने हे राहुरी येथील सोनार अजिंक्य मनोज उदावंत (वय-२७ रा.राहुरी) यांस विकले असल्याचे सांगितले. आरोपीच्या ताब्यातुन ८ हजार रु.किमतीचा चोरी केलेला रेडमी कंपनीचा जप्त करण्यात आला. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post