लाच प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी अटकेत, एसीबीची कारवाई


लाच प्रकरणी निवासी उपजिल्हाधिकारी अटकेत, एसीबीची कारवाई

परभणी : परभणीतील  गंगाखेड नगरपरिषेदत 5 प्रभागांसाठी विशेष रस्ता अनुदानासाठी तब्बल तीन कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला होता. याबाबत तांत्रिक मान्यता घेऊन अनेक दिवस झाल्यानंतरही त्याला प्रशासकीय मान्यता दिली जात नव्हती. या प्रशासकीय मान्यतेसाठी परभणीच्या निवासी उपजिल्हाधिकारी स्वाती सूर्यवंशी यांनी साडेचार लाखांची लाच मागितली होती. मात्र हे अनुदान विकास निधींसाठी आणल्याने ही लाच का द्यायची असा प्रश्न गंगाखेडचे नगरसेवक तुकाराम तांदळे यांना पडला. त्यांनी याबाबत परभणीच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

तक्रारीच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक भारत हुंबे यांनी सापळा रचला आणि मंगळवारी दुपारी पंचासमक्ष लाचेची रक्कमही थेट स्वाती सूर्यवंशी यांच्या म्हणण्यानुसार जिल्हाधिकारी कार्यालयातील अव्वल कारकून अब्दुल हकीम आणि श्रीकांत कारभाजन यांना दिली. हा सापळा यशस्वी झाल्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या तिघांना अटक केली असून पुढील कारवाई सुरु आहे.

परभणीत येण्याआधी अहमदनगर येथे भूसंपादन अधिकारी पदावर त्या कार्यरत होत्या

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post