महाविकास आघाडी सरकार पडेल ही भाबडी आशा


महाविकास आघाडी सरकार पडेल ही भाबडी आशा 
ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा स्वपक्षीयांना टोला

जळगाव :  माजी मंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महाआघाडी सरकार पडेल, ही भाबडी आशा सोडा, अशा शब्दांत भाजपतील नेत्ययांना घरचा आहेर दिला आहे. 
 वाढदिवसानिमित्त पत्रकारांशी बोलताना खडसे यांनी  स्वपक्षीय नेत्यांचे कान टोचले आहेत. महाआघाडी सरकारमध्ये एक-दीड वर्षात उलथापालथ होईल, असं वाटतं नसल्याचं खडसे यांनी म्हटलं आहे. महाविकास आघाडी सरकारकडे आवश्यक संख्याबळ आहे, त्यामुळे राज्यातील सरकार पडेल, ही आशा करणं सोडावी, असा सल्ला खडसेंनी दिला आहे.

 10-15 वर्षांपूर्वी पक्षात उदयास आलेले नेते आता आम्हाला अक्कल शिकवायला लागले आहेत. राज्यात मी पुन्हा येणार ,मी पुन्हा येणार, मी पुन्हा येणार' हे जनतेला आवडलं की नाही. याचा आता मी शोध घेणार, असल्याचं म्हणत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं नाव न घेता एकनाथ खडसे यांनी टोला लगावला आहे.

राज्यात भाजप-शिवसेना युती नसताना 123 भाजप आमदार निवडून आणले. मात्र, युती झाल्यावर 107 कसे झाले? असा सवाल यावेळी एकनाथ खडसे यांनी उपस्थित केला. पक्षात आलेल्या आयरामांचा फटका बसला आहे. मी पून्हा येईन, मी पुन्हा येईल... हे लोकांना आवडले नाही का? भाजपकडे सगळं असताना पराभव झालाच कसा? असा सवाल करत मला अनेक पक्षांची ऑफर असल्याची गौप्यस्फोट खडसेंनी यावेळी केला. मात्र, आपण भाजप सोडणार नाही. कारण पक्ष आम्ही उभा केला, असं देखील खडसेंनी सांगितलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post