रस्ते दुरुस्तीवरुन शिवसेना व भाजप जुंपली, 'त्यांना' बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा एवढा पुळका का आला?

'त्यांना' बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचा एवढा पुळका का आला? 
शिवसेनेच्या जाधव यांनी महापौरांवर केलेल्या टिकेला भाजपच्या जाधवांचे प्रत्युत्तरनगर: महापौर बाबासाहेब वाकळे यांनी  शहरामधून जाणा-या महामार्गावरील खड्डे बुजविणे बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांना काळे फासण्‍याचा इशारा देण्‍यात आला होता. कारण महामार्गावर जीवघेणे खड्डे अनेक दिवसा पासून आहेत. त्‍या ठिकाणी अपघात देखील होत आहेत. हे सर्व माहित असूनही सार्वजनिक बांधकाम काहीच कारवाई करित नाही.  याचा दत्‍ता जाधव यांना का पुळका आला. त्‍यांचे सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांशी काही लागे बांधे आहेत का?, ते अधिकारी तुमच्‍या टिळक रोडवरच्‍या हॉटेलवर येवून बसतात का ?  महामार्गावरील शहरातून जाणारे रस्‍ते दुरूस्‍त व्‍हावे अशी दत्‍ता जाधव व आंदोलनकर्ते यांची इच्‍छा दिसून येत नाही. महापौरांनी पत्रक काढल्‍यानंतर दत्‍ता जाधव व आंदोलनकर्ते  यांना जाग आली का ? वास्‍तविक महापौर वाकळे यांनी शहरातील रस्‍ते पॅचिंग करण्‍यासाठी आढावा बैठक घेतली पाऊस थांबल्‍यानंतर शहरातील सर्व रस्‍ते पॅचिंगचे काम हाती घेण्‍याचे नियोजन करण्‍यात आले आहे. शहरातील  रस्‍ते पॅचिंग संदर्भात ठेकेदार व मनपा अधिकारी यांना काम करणे बाबत आदेश देण्‍यात आलेले आहेत. जर ठेकेदार काम करित नसेल तर ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांच्‍यावर कारवाई करण्‍याचे आदेश देण्‍यात आलेले आहेत.  याची माहिती दत्‍ता जाधव व कायम प्रसिध्‍दीसाठी स्‍टंट करणारे आंदोलनकर्ते यांना नसल्‍याचे दिसून येत आहे.  शहरामध्‍ये बरेच रस्‍ते हे मंजूर आहेत परंतु फेज-2 व भुयारी गटरच्‍या कामामुळे ते प्रलंबित आहेत. अशा मंजूर असलेल्‍या रस्‍त्‍याच्‍या कामांच्‍या ठिकाणी भुयारी गटरचे काम करणेबाबत संबंधीत एजन्‍सीला आदेश दिलेले आहेत. अशी कामे शहरामध्‍ये संबंधीत एजन्‍सीकडून सुरू आहेत हे दत्‍ता जाधव व आंदोलनकर्ते यांना दिसत नाही. कारण ते जनेतेचे हित पाहयचे सोडून हॉटेलच्‍या कामामध्‍ये व्‍यस्‍त असतात.  सिनानदीमध्‍ये लॉनच्‍या माध्‍यमातून अतिक्रमण करणा-या दत्‍ता जाधव यांनी महापौरांना काळे फासण्‍याची भाषा करू नये. सार्वजनिक बांधकाम विभागाच्‍या अधिका-यांचा एवढा पुळका आला असेल तर शहराच्‍या जनतेसाठी महामार्गावरील खड्डे स्‍वखर्चातून बुजवावे असे निलेश जाधव यांनी दिलेल्‍या प्रसिध्‍दी पत्रकामध्‍ये म्‍हटले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post