तलाव भरल्याने आता दररोज पाणी सोडा - विठ्ठल राऊत .. VIDEO

तलाव भरल्याने  आता दररोज पाणी सोडा - विठ्ठल राऊत 

भुतवडा तलावाचे ग्रामस्थांनी  केले जलपुजन


जामखेड  (नासीर पठाण) : गेल्या दोन वर्षांपासून जामखेडला आठ दिवसाआड पाणीपुरवठा होत आहे. या वर्षी शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव हा शंभर टक्के भरल्याने आता जामखेड करांसाठी दररोज पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले पाहिजे असे मत माजी सरपंच विठ्ठल आण्णा राऊत यांनी भुतवडा तलावाच्या जलपुजना दरम्यान व्यक्त केले.

शहराला पाणीपुरवठा करणाऱा भुतवडा तलाव हा शंभर टक्के भरल्याने याचे जलपुजन नुकतेच माजी सरपंच विठ्ठल आण्णा राऊत व सुनील कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. शहराला वरदान आसलेला भुतवडा जोडतलाव व जुना तलाव हे दोन्ही तलाव पुर्ण क्षमतेने नुकतेच भरले आहेत. या निमित्ताने नुकतेच शनिवार दि ५ रोजी सकाळी या तलावाचे जलपुजन करण्यात आले. यावेळी अंकुश उगले भाऊसाहेब उन्हाळे अशोक पन्हाळकर संतोष गीरी विनायक राऊत विजय राजकर डॉ प्रकाश नाना भालेराव सह अनेक मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना विठ्ठल आण्णा राऊत व सुनील कोठारी यांनी बोलताना सांगितले की गेल्या अनेक वर्षांपासून जामखेड शहरातील नागरीकांना पिण्याचे पाणी वेळेवर मिळत नाही. त्यामुळे तीव्र पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत आहे. मात्र आता भुतवडा तलाव हा शंभर टक्के भरल्याने नागरीकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आसले तरी तलावात पाणी उपलब्ध आसुनही नागरीकांना आठ ते दहा दिवसाआड पाणी पुरवठा होत आहे. त्यामुळे आता तरी नागरीकांना नगरपरिषद कडुन कसल्याही परीस्थितीत दररोज पाणी पुरवठा झाला पाहिजे.

VIDEO

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post