उजनी धरणातून पाणीपुरवठा योजना मार्गी : आ.रोहित पवार ...VIDEO

उजनी धरणातून पाणीपुरवठा योजना मार्गी 
भुतवडा तलावातील पाण्याचे आ. रोहीत पवार यांनी केले जलपुजन

    - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - - -
जामखेड (नासीर पठाण ):  शहराला पिण्याच्या पाण्यासाठी उजनी धरणातून नियोजित पाणीपुरवठा योजनांतील सर्व अडथळे दूर झाले आहे त्यामुळे येत्या काही काळात योजना मार्गी लागेल. भुतवडा तलाव व जोडतलाव पूर्ण क्षमतेने भरला असून यापुढील काळात त्याबाबत योग्य नियोजन केले जाणार आहे असे प्रतिपादन आ. रोहीत पवार यांनी केले.
       जामखेड शहराला पाणीपुरवठा करणारा भुतवडा तलाव दोन वर्षानंतर प्रथमच ओव्हरफ्लो झाला या तलावातील पाण्याचे जलपुजन आ. रोहीत पवार यांच्या हस्ते विधीवत पुजा करून करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी मुख्याधिकारी मिनिनाथ दंडवते, शाखा अभियंता रामभाऊ ढेपे, कर्जत जामखेड विधानसभा अध्यक्ष प्रा. मधुकर राळेभात, प्रदेश सरचिटणीस राजेंद्र कोठारी, माजी नगराध्यक्ष विकास राळेभात, नगरसेवक डिगांबर चव्हाण, पवनराजे राळेभात, राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुरेश भोसले, वकील संघाचे अध्यक्ष अँड. विशाल पोले, अँड. हर्षल डोके, प्रशांत राळेभात, राजेंद्र गोरे, व्यापारी विजय कोठारी आदी उपस्थित होते.
       यावेळी आ. पवार म्हणाले सदर तलाव कोरडा पडला त्यावेळी बारामती ॲग्रो व भारतीय जैन संघटनेमार्फत तलावातील मोठ्या प्रमाणावर गाळ काढला त्यामुळे तलावाची साठवण क्षमता वाढली आहे. दोन वर्ष पिण्यासाठी पाणी पुरेल त्यामुळे जामखेड करांची चिंता मिटली आहे. नियोजीत उजनीतील धरणातील पाणी योजना कार्यान्वित होईल. यानंतर भुतवडा व जोडतलावातील पाण्याचा कसा वापर करता येईल तसेच तलावातील आणखी गाळ काढता येईल का यादृष्टीने नियोजन करण्यात येईल असे आ. रोहीत पवार म्हणाले.
          यानंतर आ. रोहीत पवार यांनी नायगाव तलाव व धोंडपारगाव तलावाचे जलपुजन केले.
VIDEO

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post