करोना संसर्गात देशातील अधिक संवेदनशील जिल्ह्यात नगरचा समावेश

करोना संसर्गात देशातील अधिक संवेदनशील जिल्ह्यात नगरचा समावेश
कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी व चाचण्या वाढवण्याचे निर्देश

नवी दिल्ली- देशात करोनाबाधितांची उच्चांकी नोंद होत असून पाच राज्यात परिस्थिती चिंताजनक असल्याचे केंद्राने नमूद केले आहे.  केंद्र सरकारने महाराष्ट्रासह या पाच राज्यातील मिळून 35 जिल्ह्यातील परिस्थितीत अधिक संवेदनशील असल्याचे सांगितले आहे. यात महाराष्ट्रातुन अहमदनगर जिल्ह्याचाही समावेश आहे.  याशिवाय राज्यातील मुंबई, मुंबई उपनगर, कोल्हापूर, पुणे, सांगली,सातारा,  सोलापूर,  औरंगाबाद, धुळे, जळगाव, रायगड, नागपूर, ठाणे, पालघर या जिल्ह्यांचा समावेश आहे.  संवेदनशील जिल्ह्यात करोना संसर्गाचे प्रमाण जास्त आहे.  या जिल्ह्यांमध्ये युध्दपातळीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात यावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. कंटेनमेंट झोनची प्रभावी अंमलबजावणी करताना चाचण्या वाढवण्यात याव्यात अशा सूचना स्थानिक प्रशासनाला देण्यात आल्या आहेत. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post