मला करोनाची लागण झाली तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारेल


मला करोनाची लागण झाली तर मुख्यमंत्र्यांना मिठी मारेल
भाजपच्या नवनियुक्त राष्ट्रीय सचिवांचे वादग्रस्त वक्तव्य

कोलकाता : भाजपचे नवनियुक्त राष्ट्रीय सचिव आणि माजी आमदार अनुपम हाजरा यांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या बाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. “मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन”, असं अनुपम हाजरा म्हणाले.

“आमचे कार्यकर्ते कोरोनापेक्षा जास्त मोठ्या संकटांशी लढत आहेत. ते ममता बॅनर्जी यांच्याविरोधात लढत आहेत. ते कोरोना महामारीने प्रभावित झालेले नाहीत. त्यांना कुणाचीही भीती वाटत नाही”, असं हाजरा म्हणाले.
“जर मला कोरोनाची लागण झाली तर मी ममता बॅनर्जी यांना मिठी मारेन. कारण या संकटात त्यांनी कोरोनाबाधितांना खूप चुकीची वागणूक दिली आहे. कोरोनाबाधित मृतदेहांवर रॉकेल टाकून जाळलं आहे. अशा प्रकारची वर्तवणूक आपण कुत्रे आणि मांजरींसोबतदेखील करत नाही”, असा आरोप अनुपम हाजरा यांनी केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post