नगरमध्ये दुकानांची वेळ सायंकाळी 7 पर्यंत वाढवली, रात्रीची संचारबंदी रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यान

नगरमध्ये दुकानांची वेळ सायंकाळी 7 पर्यंत वाढवली
रात्रीची संचारबंदी रात्री 9 ते पहाटे 5 दरम्यान


नगर - जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील लॉकडाऊनच्या निर्बंधात  30  सप्टेंबर पर्यंत वाढ केली आहे. प्रशासनाने राज्य सरकारच्या निर्देशानुसार सवलती व निर्बंध कायम ठेवले आहेत. स्थानिक पातळीवरील दुकानांसाठी सकाळी 9 ते सायंकाळी 5 यावेळेत असलेली मुदत आता सायंकाळी 7 पर्यंत वाढवण्यात आली आहे. रात्रीच्या संचारबंदीतही सवलत देत संचारबंदी कालावधी रात्री 9 ते पहाटे 5 असा करण्यात आला आहे.  दुकानांची वेळ सायंकाळी 7 वाजेपर्यंत केल्याने व्यापारी,  व्यावसायिकांना दिलासा मिळाला आहे. जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी सदर आदेश जारी केले आहे.  

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post