आ.रोहित पवारांमध्ये दिसतात 'या' दोन दिग्गजांचे गुण, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या रोहित पवारांना हटके शुभेच्छा

आ.रोहित पवारांमध्ये दिसतात 'या' दोन दिग्गजांचे गुण, 
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षांच्या रोहित पवारांना हटके शुभेच्छा

नगर- कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार रोहित पवार यांच्यात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे गुण व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सारखी कामाची कार्यशैली दिसुन येते, असे कौतुक राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी केले आहे.
आ.रोहित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देताना फाळके यांनी सोशल मीडियावर पवारांच्या मतदार संघातील कामाचे कौतुक केले आहे.
राजेंद्र फाळके यांनी म्हटलं आहे की,
मी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या सोबत १९८४ - ८५ साला पासून सक्रिय राजकारणात आहे. अजितदादा पवार, सुप्रियाताई सुळे यांच्या सोबत मी मोठ्या कालावधी पासून सक्रिय राजकारणात सामाजिक काम करत आहे. दोन पिढ्यांच्या सोबत मी मोठ्या कालावधीपासून काम केलं आहे. मला रोहित पवार यांच्या मध्ये शरद पवार साहेबांचे गुण व अजितदादा पवार यांच्या कामाची कार्यशैली दिसून येते. पवार कुटुंबीयांचा राजकीय वारसा रोहित पवार मोठ्या खुबीने पुढे घेऊन जात आहेत. रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मधून उमेदवारी करावी हा माझा आग्रह होता. आज रोहित पवार मोठ्या खुबीने मतदारसंघात चांगल्या प्रकारे काम करताना दिसत आहेत. कर्जत जामखेड मतदार संघाचे आमदार श्री. रोहित पवार यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post