67 हजाराच्या गांजासह आरोपीला अटक

67 हजाराच्या गांजासह आरोपीला अटक
नगर - श्रीरामपुर शहर पोलीस स्टेशन हद्दीत संजयनगर वार्ड नं २ परिसरात पोलिसांनी कमलेश उत्तम पवार (वय 23, रा.अहिल्यानगरी, श्रीरामपूर ) यास अवैधरित्या गांजा बाळगल्याप्रकरणी ताब्यात घेतले आहे.  त्याचेकडुन 67 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त करण्यात आला.  आरोपीविरुद्ध
श्रीरामपुर शहर पोस्टेला गुन्हा दाखल करण्यात आलेला असुन सदरचा गांजा कोठुन आणला असुन तो कोणास विक्री करणार आहे याबाबत अधिक माहीती घेण्यात येत आहे.  श्रीरामपुर शहर पोस्टेचे पोलीस निरीक्षक श्रीहरी बहिरट यांचेसह सपोनि/ समाधान पाटील, तपास पथकाचे पोसई संतोष बहाकर,पोहेकॉ जे.के. लोंढे, पोकॉ/ सुनिल दिघे,  गणेश गावडे ,
महेंद्र पवार,  अर्जुन पोकळे,  पंकज गोसावी, पोकॉकिशोर जाधव, मपोकॉ अर्चना बर्डे यांनी ही कारवाई केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post