नगर गणेश दर्शन 2020- नेवाशाचा / इरिगेशनचा पावन गणपती


नेवाशाचा / इरिगेशनचा  पावन गणपती 


आजचा अहमदनगर जिल्ह्यातील गणपती हा आपला शेवटचा भाग.  या अकरा दिवसात आपण दररोज एक नवीन अहमदनगर जिल्ह्यातील गणपतीची माहिती अभ्यासली.  अहमदनगर जिल्हा जसा नावाने मोठा तसा तो विस्ताराने पण मोठा आहे. 14 तालुक्यांचा विस्तार अनेक गावात तालुक्यात काहीतरी खास ऐतिहासिक वैशिष्ट्य आहे.  गणपतीची मंदिरे हि प्रत्येक तालुक्यात आहेत. आपण त्यापैकी 11 घेतले आहेत. बाकीचे गणपती पुढच्या भागात घेण्याचा प्रयत्न करू.
फकीरवाडा किंवा इरिगेशनचा गणपती हा पावन गणपती म्हणून ओळखला जातो हे मंदिर नगर औरंगाबाद रोडावर पूर्वाभिमुख आहे.  अहमदनगर महानगर पालिके शेजारी हे भव्य मंदिर आहे.  येथे दररोज आरती होते.  भाविक मोठया संख्येने गर्दी करतात.
नेवाशाचा पावन गणपती हे मंदिर श्रीरामपूर रोड चौकात आहे.  एकशिळेतील गणपतीची प्रसन्नमुद्रा आपणास पाहावयास मिळते.  नेवासा तालुक्यात मानाचा गणपती म्हणून पावन गणपती मनाला जातो. दर चतुर्थीला येथे मोठी गर्दी होते.  मोठ्या श्रद्धेने भाविक भक्त येथे येतात. आपल्या मनोकामना पावन गणपती पूर्ण करतो अशी अनेक भाविकांची श्रद्धा आहे. नेवाशात आल्यावर संत ज्ञानेश्वर यांच्या पैस खांबाचे दर्शन घेऊन अनेक भाविक पावन गणपतीच्या दर्शनास येतात.
आपणास   अनंत चतुर्थीचा भक्तीमय मंगलमय  शुभेच्छा. 

संकलन - प्रा. डॉ. संतोष यादव

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post