सैनिकांनी थेट श्रीनगरहून फोन करुन मानले 'या' निर्णयाबद्दल मंत्र्यांचे आभार

सैनिकांनी थेट श्रीनगरहून फोन करुन मानले 'या' निर्णयाबद्दल मंत्र्यांचे आभार
नगर जिल्ह्यातील हिवरा येथील सैनिकही आनंदीत

नगर : महाराष्ट्रातील आजी -माजी सैनिक आणि विधवा पत्नीना मालमत्ता करात सूट देण्याचा निर्णय नुकताच महाराष्ट्रा सरकारने घेतला आहे.  या निर्णयाचे आजी माजी सैनिकांकडून स्वागत होत आहे.  श्रीनगरला सीमेवर तैनात असलेल्या महाराष्ट्रातील सैनिकांनी थेट राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला व या निर्णयाचे स्वागत केले.
 संतोष पडळकर (गलगले), अर्जुन लगड (हिवरा, अहमदनगर), केतन भोसले( पिराचीवाडी), आशिष पाटील (दरियापुर अमरावती), अक्षय रेमले (किन्हे आजरा), विनायक पाटील (कोल्हापूर), ऋषी मोरो (वर्धा) या जवानांनी व्हिडीओ कॉलिंगद्वारे संवाद साधून आभार मानले व कृतज्ञता व्यक्त केली. या जवानांशी बोलताना मन भारावले व या जवानांना सलाम केला, अशी भावना ना.मुश्रीफ यांनी व्यक्त केली.
VIDEO


0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post