'या' कारणाने कलाकार मंडळी ड्रग्ज घेतात, राखी सावंत हिचे मत

'या' कारणाने कलाकार मंडळी ड्रग्ज घेतात, राखी सावंत हिचे मत

मुंबई: अंमली पदार्थ चौकशीच्या जाळ्यात आणखी काही सिनेतारका येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यादरम्यान अभिनेत्री राखी सावंत हिनं बॉलिवूडमधील कलाकार ड्रग्ज का घेतात, त्याचं कारण सांगितलं आहे.


एका वृत्तसमुहाला दिलेल्या मुलाखतीत राखीनं बॉलिवूड आणि ड्रग्ज कनेक्शन यासंदर्भात अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. बॉलिवूडमध्ये ग्लॅमरला सर्वाधिक महत्त्व असून ग्लॅमरसाठी कलाकारमंडळी ड्रग्जचं सेवन करत असल्याचं राखीनं म्हटलं आहे. ग्लॅमर टिकून राहण्यासाठी किंवा वजन वाढू नये साठी कलाकारांना ड्रग्ज सेवन करण्याचा सल्ला दिला जातो. मलाही काही वर्षापूर्वी वजन कमी करण्यासाठी काही ड्रग्जचं सेवन करण्याचा सल्ला देण्यात आला होता. कारण ड्रग्ज घेतल्यानं भूक लागत नाही. वजणावर नियंत्रण राखलं जातं,असं म्हटलं जातं. परंतु मा ड्रग्ज ऐवजी हॉट योगाची निवड केली. बॉलिवूडमधील कलाकारांना व्यायाम किंवा योग करायला वेळ मिळत नाही. त्याऐवजी ते वजन कमी करण्यासाठी असल्या शॉर्टकटचा वापर करतात, असं राखी म्हणाली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post