सुप्रसिद्ध 'सुधाकर भेळ' सेंटरचे सुधाकर आडसुळ यांचे निधन

*सुधाकर आडसुळ यांचे दुःखद निधन* 


                      नगर- तोफखाना येथील रहिवासी व शहरातील सुप्रसिद्ध सुधाकर भेळ सेंटरचे संचालक सुधाकर संतराम आडसुळ (वय७७) यांचे बुधवारी (दि.२३) रोजी सकाळी दुःखद निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी, २ मुले,३ मुली ,सुना,नातवंडे असा परिवार आहे. त्यांनी गेली ६० वर्षापासून नगरकरांची 'सुधाकर भेळ' या फर्मच्या माध्यमातून सिध्दीबाग येथे सेवा केली. सिध्दीबाग येथे गेल्यावर त्यांची भेळ खाऊनच नगरकर सिद्धीबागेच्या बाहेर पडत. या भेळ सेंटरच्या माध्यमातून त्यांचा मोठा मित्र परिवार होता. त्याच्या अकाली निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post