'आयपीएल'वर ऑनलाईन बेटिंग, 3 लाखांचा मुद्देमाल जप्त
नवी मुंबई : आयपीएल क्रिकेट सामन्यावर ऑनलाइन सट्टा लावणाऱ्या एकाला नवी मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. विजय खैरनार असे अटक केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. त्याच्याकडून बेटिंगच्या साहित्यासह जवळपास 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. विजय घरात बेटिंगचे काम करत होता. पोलिसांनी घरावर छापा टाकून हा सट्टा उघडकीस आणला आहे.
खैरनारवर बेटिंग लावल्या प्रकरणी अटक करून कोपरखैराने पोलीस ठण्यात गुन्हा दाखल करणयात आला आहे. खैरनारकडून दोन मोबाईल, टीव्ही तसेच 2 लाख रुपयांची रोकड एकूण जवळपास 3 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
Post a Comment