जबरी चोरी, दरोडा, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद

श्रीगोंदा तालुक्यात जबरी चोरी, दरोडा, घरफोडी करणारा सराईत गुन्हेगार अटक,
 सोन्याचेदा दागिन्यांसह सुमारे 5 लाख 56 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त, 
श्रीगोंदा गुन्हे प्रकटीकरण पथकाची कामगिरी

नगर: दि 15/ 12/ 2019 रोजी तुलसाईनगर, काष्टी येथे बंद घरात कुलुप तोडुन घरफोडी झाली
होती. तेथुन सोन्या चांदीचे दागीने चोरीस गेले होते. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस स्टेशनला
गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस
अधिक्षक अखिलेश कुमार सिंह, अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, .उपविभागीय
पोलीस अधिकारी संजय सातव, पो.नि.दौलतराव जाधव यांचे मार्गदर्शनाखाली सदर गुन्हयाचा
तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र सानप हे करीत होते.
दि .16 सप्टेंबर रोजी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडील सपोनि राजेंद्र सानप, पोहेकॉ अंकुशढ ढवळे पोकॉ प्रकाश मांडगे, पोकॉ गोकुळ इंगवले, पोकॉ संजय काळे यांनी तांत्रिक व गोपनीय पध्दतीने तपास करुन अनेक दरोडा, जबरी चोरी, घरफोडीच्या गुन्ह्यात फरारी असणारा आरोपी सुरेश देवराम गायकवाड ( रा.भिंगान ता.श्रीगोंदा) यास अटक करुन जबरी चोरी, घरफोडी वचोरीचे गुन्हे उघडकीस आणुन सोन्याचांदीचे दागिने व मोबाईल फोन जप्त केला आहे. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post