खून, दरोडे प्रकरणातील सराईत आरोपी जेरबंद, श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी

खून, दरोडे प्रकरणातील बीड जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार जेरबंद, श्रीगोंदा पोलिसांची कामगिरी 


नगर - खुनासह दरोडे, चोरीचे अनेक गुन्हे करणारा सराईत आरोपी ढोल्या उर्फ लखन नारायण भोसले (रा.वाहीरा, ता.आष्टी, जि.बीड ) याला श्रीगोंदा पोलिसांनी जेरबंद केले आहे. दि.23 ऑगस्ट रोजी रात्री आढळगाव शिवारात एका महीलेचे गळ्यातील मंगळसुत्र हत्याराचा धाक दाखवुन जबरदस्तीने ओढुन चोरुन नेले होते. त्याबाबत श्रीगोंदा पोलीस
स्टेशनला गुन्हा दाखल होता. सदर गुन्हयाचा प्राथमिक तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सपोनि राजेंद्र सानप हे करीत होते.
दि.02 सप्टेंबर  रोजी सदरची जबरी चोरी ही बीड जिल्ह्यातील ढोल्या उर्फ लखन नारायण भोसले याने केल्याची माहीती पो.नि.दौलतराव जाधव,सपोनि राजेंद्र सानप व तपास पथकास मिळाली. त्यानुसार जाधव यांनी कॉबिग ऑपरेशन राबवुन सदर आरोपी  ढोल्या उर्फ लखन नारायण भोसले यास
शिताफीने पकडुन ताब्यात घेतले आहे.
त्याचेकडुन चोरीच्या गुन्ह्यातील 15 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र व गुन्ह्यात वापरलेला कोयता,कटावणी हस्तगत केले आहे.सदर आरोपीस न्यायालयाने दि. 5 सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपीविरुध्द यापूर्वी श्रीगोंदा,  जामखेड,  कर्जत पोलिस ठाण्यात विविध गुन्हे दाखल आहेत.
सदरची कारवाई पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह ,अप्पर पोलीस अधिक्षक सागर पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी संजय सातव यांचे मार्गदर्शनाखाली श्रीगोंदा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दौलतराव जाधव,गुन्हे शाखेचे सपोनि राजेंद्र सानप,पोसई अमित माळी,पोहेकॉ अंकुश ढवळे,पोकॉ प्रकाश मांडगे, संजय काळे,  गोकुळ इंगवले, योगेश सुपेकर,  नय्युम पठाण, वैभव गांगडे, यांनी
केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post