वीज कंपनीचा सहायक अभियंता लाच प्रकरणी ताब्यात, आरोपी दुसर्यांदा एसीबीच्या जाळ्यात


वीज कंपनीचा सहायक अभियंता लाच प्रकरणी ताब्यात, आरोपी दुसर्यांदा एसीबीच्या जाळ्यात

नगर: विद्युत जोडणी मंजूर करुन मीटर देण्यासाठी ४ हजारांची लाच घेताना महावितरणचा भाळवणी सेक्शन मधील सहायक अभियंता भाऊसाहेब गोविंद पगारे, (वय- 44 वर्ष, सहायक अभियंता, वर्ग- 2,  म.रा.वि.वि कं, भाळवणी सेक्शन. ता- पारनेर, जि अहमदनगर .रा- अंबिका ट्विन बंगलो, शिवनगर, पाईपलाईन रोड, अहमदनगर.) याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ही कामगिरी केली. आरोपी पगारे याला यापूर्वीही लाच प्रकरणी अटक झाली होती.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी व त्यांचे मित्र यांनी जामगाव येथे एकत्रित पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. त्यांनी सदर ठिकाणी विद्युत जोडणी घेणेकरिता फेब्रुवारी 2020 मध्ये ऑनलाईन कोटेशन भरलेले आहे व आवश्यक ती फी चलनाने भरली होती. त्यानंतर तक्रारदार यांनी भाळवणी येथील महावितरण कार्यालयात विद्युत जोडणी व मीटर देणे करिता आरोपी लोकसेवक यांची वेळोवेळी भेट घेऊन विनंती केली. परंतु त्यांनी मीटर उपलब्ध नसलेचे सांगुन टाळाटाळ केली. आज दि 28/09/20 तक्रारदार यांनी आरोपी लोकसेवक यांची भेट घेतली असता आरोपी याने तक्रारदार यांचे कडे मिटर देणे करिता  रु 5 हजारांची मागणी केली. तक्रारदार यांची आरोपी यास लाच देण्याची इच्छा नसलेने त्यांनी ला.प्र.वि अहमदनगर यांचे कडे दिलेल्या तक्रारीवरून केलेल्या लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी याने तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष रु 5000/- ची मागणी करुन तडजोडी अंती रु 4000/-ची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.  आज  महावितरण कार्यालय भाळवणी येथे आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी याने तक्रारदार यांचे कडुन रु 4000/- लाचेची रक्कम पंचासमक्ष स्विकारली असता त्यांना  रंगेहाथ पकडण्यात आले.आरोपी यांचे विरुद्ध जानेवारी 2004 मध्येही लाचेचा सापळा कारवाई झाली होती.

 लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे  पोलीस उप अधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिपक करांडे, शाम पवरे,  पो.हवा. तन्वीर शेख,   पो.ना. प्रशांत जाधव, विजय गंगुल,रविंद्र निमसे, राधा खेमनर,  संध्या म्हस्के, हरुन शेख यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post