30 हजारांची लाच स्विकारताना आयटीआयमधील भांडारपालाला रंगेहाथ पकडले


30 हजारांची लाच स्विकारताना आयटीआयमधील भांडारपालाला रंगेहाथ पकडले
नगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

नगर: सेवानिवृत्त भांडारपालास चार्ज क्लिअर करुन वरिष्ठांना तसे प्रमाणपत्र देण्यासाठी 30 हजारांची लाच स्विकारताना कोपरगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील भांडारपाल विलास चिमाजी कुसाळकर ,( वय 52 वर्ष) यास नगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले.

यातील तक्रारदार यांचे सासरे हे ऑगस्ट 2018 मध्ये शासकीय आय टी आय, कोपरगाव येथुन भांडारपाल या पदावरून सेवानिवृत्त झाले होते. त्यांनी भांडारगृहाचा चार्ज देताना काही वस्तु कमी असल्याचे कारण सांगून त्यांचे सेवानिवृत्ती नंतर नियमानुसार मिळणारे आर्थिक लाभ ,पेन्शन , सातवे वेतन आयोगाचा फरक रोखुन धरण्यात आले होते. तक्रारदार यांनी त्यांचे सासरे यांचे सह यातील आरोपी लोकसेवक यांची भेट घेतली असता त्यांनी गहाळ वस्तू बाहेरून खरेदी करुन आणुन व 50000/- रु दिल्यास त्यांचा चार्ज क्लिअर करुन वरिष्ठांना तसे प्रमाणपत्र देतो असे सांगितले. तक्रारदार यांना लाच देण्याची इच्छा नसलेने त्यांनी ला.प्र.वि अहमदनगर यांचे कडे दिलेल्या तक्रारीवरून दि 18/09/2020 रोजी कोपरगाव आय टी आय कार्यालयात आयोजित लाच मागणी पडताळणी दरम्यान आरोपी लोकसेवक यानी तक्रारदार यांचे कडे पंचासमक्ष लाचेची मागणी करुन रु 30000/- स्विकारण्याची तयारी दर्शवली. त्यानंतर आज दिनांक 22/09/2020 रोजी  पुणतांबा चौफुली येथील  हॉटेलआनंद परमीटरुम समोर आयोजित लाचेच्या सापळा कारवाई दरम्यान आरोपी लोकसेवक यांनी पंचासमक्ष रु 30000/- लाच तक्रारदार यांचे कडून स्विकारली असता त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले.
 एसीबीचे पोलिस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शाम पवरे,
दिपक करांडे, पो. हवा.तन्वीर शेख, पो ना प्रशांत जाधव,  पोना विजय गंगुल,  रविंद्र निमसे, वैभव पांढरे , मपोशि राधा खेमनर, संध्या म्हस्के,  हरुन शेख, अशोक रक्टाटे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post