नगर जिल्ह्यात आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज तर ९०० बाधितांची रुग्णसंख्येत भर

 दिनांक: २२ सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा

आतापर्यंत ३३ हजार ३८१ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.४८ टक्के

आज ९३३ रुग्णांना डिस्चार्ज तर ९०० बाधितांची रुग्णसंख्येत भर



अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.४८ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ९०० ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४१४६ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ७६, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २२४ आणि अँटीजेन चाचणीत ६०० रुग्ण बाधीत आढळले.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ४२,  पाथर्डी ०९, नगर ग्रामीण ०१, श्रीरामपूर ०२, नेवासा ०५,  श्रीगोंदा ०६, पारनेर ०३, राहुरी ०३, कोपरगाव ०३ आणि इतर जिल्हा ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २२४ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ४०, संगमनेर १४, राहाता १९, पाथर्डी ०६, नगर ग्रामीण २९, श्रीरामपुर ३४, नेवासा ११, श्रीगोंदा ०२, पारनेर २३, अकोले ०३, राहुरी २२, शेवगाव ०३, कोपरगाव १० आणि जामखेड ०८ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज ६०० जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा १६२, संगमनेर ४४, राहाता ५१, पाथर्डी ५२, नगर ग्रामीण २१,  श्रीरामपूर २४, कॅंटोन्मेंट १३, नेवासा १३,  श्रीगोंदा १६, पारनेर ३१, अकोले ३१, राहुरी २३, शेवगाव १०, कोपरगाव ३९, जामखेड ३१, कर्जत २८, मिलिटरी हॉस्पिटल ०८ आणि इतर जिल्हा ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज ९३३ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा २५०, संगमनेर ५५, राहाता ८७, पाथर्डी ३५, नगर ग्रा. २९, श्रीरामपूर ९६, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ४७, श्रीगोंदा २८, पारनेर ५४, अकोले ३६, राहुरी ३६, शेवगाव ४१, कोपरगाव ४७, जामखेड ४४,

कर्जत ३३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या: ३३३८१


उपचार सुरू असलेले रूग्ण:४१४६


मृत्यू:६३२


एकूण रूग्ण संख्या:३८१५९


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


#माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post