नगरमध्ये करोनाचा कहर कायम, 24 तासात 869 करोनाबाधित

*दिनांक: ०७ सप्टेंबर २०२०, रात्री ७-३० वा*

*बरे झालेल्या रूग्णांची संख्या २२ हजाराहून अधिक*

*रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८३.६४ टक्के*

**आज ३८० रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज तर नव्या ८६९  बाधितांची रुग्णसंख्येत भर*


*अहमदनगर*: जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २२ हजार १५० इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८३.६४ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (रविवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ८६९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३९५४ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ३२९,  खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत २४६ आणि अँटीजेन चाचणीत २९४ रुग्ण बाधीत आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ६३, संगमनेर ४९,  राहता ०३, पाथर्डी ०५, नगर ग्रामीण ३८, श्रीरामपूर १०, कॅंटोन्मेंट ०७, नेवासा ०५, श्रीगोंदा ४३, पारनेर ०८, अकोले  ३३, राहुरी ३२, कोपरगाव २६, जामखेड ०२, कर्जत ०५  अशा रुग्णांचा समावेश आहे.

खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या २४६ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा ११२, संगमनेर २०, राहाता २४,पाथर्डी ०१, नगर ग्रामीण १५, श्रीरामपुर २४, कॅंटोन्मेंट ०४, नेवासा ०६, श्रीगोंदा ०२,  पारनेर १५, अकोले ०१, राहुरी १६, कोपरगांव ०२, जामखेड ०२ आणि कर्जत ०२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अँटीजेन चाचणीत आज २९४ जण बाधित आढळुन आले. यामध्ये, मनपा ८६, संगमनेर २३, राहाता २१, पाथर्डी ०६, नगर ग्रामीण १६, श्रीरामपूर १७, कॅंटोन्मेंट ०२, श्रीगोंदा १९, पारनेर १८, अकोले २७, राहुरी ०१, कोपरगाव ११, जामखेड १५ आणि कर्जत ३२ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ३८० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा ९८, संगमनेर २७, राहाता ३४, पाथर्डी ०८, नगर ग्रा.३९, श्रीरामपूर ३२, कॅंटोन्मेंट १३,  नेवासा ३२, श्रीगोंदा १५, पारनेर २१, अकोले १०, राहुरी १३, शेवगाव ०१,  कोपरगाव १६, जामखेड ०३, कर्जत १७ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: २२१५०*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:३९५४*

*मृत्यू:३७८*

*एकूण रूग्ण संख्या:२६४८२*

*(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)*

*STAY HOME STAY SAFE*

*प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा*

*स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या*

*अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा*

*खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका*

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post