ट्रक अडवुन खुन व लूटमार करणारे 8 जण सराईत आरोपी २४ तासाचे आत जेरबंद

  टोल नाक्यावर ट्रक आडवुन खुनासहित लुटणारे 8 जण सराईत आरोपी २४ तासाचे आत जेरबंद
लोणी पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेची संयुक्त कारवाई.

नगर -  7 सप्टेंबर  रोजी फिर्यादी भुपेंद्रसिह बहादुरसिहं ठाकुर (वय ३६ वर्ष, धंदा ड्रायव्हर, रा. रामाहेगव,
ता.धरमपुरी जि. धार (मध्यप्रदेश)) यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादी व त्यांचा साथीदार कुलदीपसिहं तुंग हे दोघे ट्रक (गाडी नं.एमएच-०९-एचएच-५१९३) या गाडीतुन गहु भरुन इंदोर येथुन बैंगलोर येथे जात
असतांना दिनांक ०६ रोजी रात्री 10.15  दरम्यान निर्मळपिंप्री शिवारात टोलनाक्या जवळ  ६ ते ७ इसमांनी मालट्रक अडवली. आरोपींनी लाकडी दांडक्यांचा तलवारीचा व चाकुचा धाक दाखवुन फिर्यादीचे मानेवर चाकुचा वार करुन त्यास जबर दुखापत करुन फिर्यादी जवळचे रोख ३०० रु. जबरदस्तीने काढून घेतले व कुलदीपसिंह तुंग( वय ४८ वर्ष) याचे मानेवर चाकुचा वार करुन  जिवे ठार मारले. या फिर्यादीवरूनदिल्याने
 गुन्हा दाखल करण्यात आला.
त्याप्रमाणे दिनांक ०७ सप्टेंबर २०२० रोजी फिर्यादी खालीद वाहद शेख (वय ३५ वर्ष धंदा ड्रायव्हर रा. आयशानगर,मालेगाव जि. नाशिक) यांनी लोणी पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली की, फिर्यादी व त्यांचा साथीदार आयुब शेख
असे त्यांचे ताब्यातील ट्रक (नं. एमएच-१५-ईजी-५८०८ )मधुन गहु भरुन मालेगाव येथुन बैंगलोर असे जात असतांना
दिनांक ०६ रोजी रात्री 10  ते 11 दरम्यान निर्मळपिंप्री शिवारात टोलनाक्या जवळ  ६ ते
७ इसमांनी येवुन फिर्यादीस तलवार,लाकडी दांडके व चाकुचा धाक दाखवुन त्यांचेकडील रोख रक्कम २५०००  रु.
बळजबरीने काढुन घेतले.
सदर दोन्ही गुन्हयाचे गांभीर्य लक्षात पोलिसांनी तपास केला व  किरण राजु राशीनकर( वय २४ रा. भगवतीपुर, कोल्हार) यास ताब्यात घेतले व सदर गुन्हयांचे अनुषंगाने त्याचेकडे अधिक चौकशी केली असता त्याने सदर गुन्हयात
सहभागी असलेल्या इतर आरोपींची नावे सांगीतली. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेचे पथकाला सोबत घेवुन गुन्हयात सहभागी असलेले इतर आरोपी सोहेल नशीर शेख ( वय १९ रा.पिंजारगल्ली, कोल्हार ), संतोष सुरेश पठारे (वय २४ रा.चर्चजवळ, कोल्हार),  विशाल कचरु लोखंडे (वय १९ रा. कोल्हार हाऊसींग सोसायटी), अक्षय राजेंद्र
शिंदे (वय १९ रा. राऊतवस्ती, कोल्हार), संकेत किरण लोखंडे (वय १८ रा.भारत पेट्रोलपंपा जवळ, कोल्हार),  रुपेश ज्ञानेदव चव्हाण (वय १८ रा. सुरेंद्र खेडे यांचे वस्तीवर, कोल्हार),  सागर सोमनाथ देशमाने (वय ३२ रा. अंबीकानगर ,कोल्हार) यांना कोल्हार परीसरातुन शिताफीने ताब्यात घेण्यात आले. सदर गुन्हयामध्ये आरोपी असलेला
आनखी एक इसम फरार असुन त्याचा शोध चालु आहे.  आरोपींकडे चौकशी केली असता सदर आरोपींनी
सदरचे गुन्हे केल्याचे निष्पन्न झाल्याने सदर आरोपींना गुन्हयात अटक करुन पुढील कारवाई लोणी पोलीस स्टेशन
करीत आहे.
सदरची कौतुकास्पद कारवाई पोलिस अधीक्षक अखिलेश कुमार सिंह,  अति.पोलीस अधीक्षक सागर पाटील, पोलिस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे  यांचे सुचना व मार्गदर्शनाखाली लोणी
पो.स्टेचे पथकातील सपोनि प्रकाश पाटील, पोसई नाना सुर्यवंशी, अशोक शिंदे, राजेंद्र औटी, दिपक रोकडे, संभाजी कुसळकर,  सोमनाथ वडणे व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील
पोनि दिलीप पवार, सपोनि शिशीरकुमार देशमुख, पोसई गणेश इंगळे ,पोहेकॉ हिंगडे, मनोहर
गोसावी, विजय बेठेकर, सुनिल चव्हाण, शंकर चौधरी, अण्णा पवार,
विशाल दळवी,  राम माळी, संतोष लोढे, दिपक शिंदे, मच्छिद्र बर्डे,  योगेश सातपुते, रविंद्र घुगासे,  संदिप दरंदले, प्रकाश वाघ, रणजीत जाधव, जालींदर माने, कोतकर, धुळे यांनी केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post