आज नव्या ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ०५ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल

जिल्ह्यात २१ हजाराहून अधिक रुग्ण बरे होऊन बरतले घरी

आज ६२२ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.०३ टक्के

आज नव्या ७८ बाधितांची रुग्णसंख्येत भर


अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६२२ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २१ हजार १३२ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.०३ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शुक्रवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ७८ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २७९३ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ११, संगमनेर ५१, पाथर्डी ०२, श्रीगोंदा ०२, अकोले  ०१, राहुरी १०, शेवगाव ०१, अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६२२ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा १७८ संगमनेर ७७ राहाता ३६, पाथर्डी ३१, नगर ग्रा.३१, श्रीरामपूर ३७, कॅंटोन्मेंट ०५,  नेवासा १९, श्रीगोंदा ३७, पारनेर १९, अकोले २९, राहुरी २१, शेवगाव ०३,  कोपरगाव ५०, जामखेड ३२ कर्जत १४, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: २११३२

उपचार सुरू असलेले रूग्ण:२७९३

मृत्यू: ३५६

एकूण रूग्ण संख्या:२४२८१

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post