आज नव्या ६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर

आज ७७८ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

आतापर्यंत १९ हजार ९६१ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८७.६६ टक्के

आज नव्या ६६ बाधितांची रुग्णसंख्येत भर


अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ७७८ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार ९६१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८७.६६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (बुधवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ६६ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २४९१ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, नगर ग्रामीण ०२, राहुरी ०५, शेवगाव ०१, कोपरगाव ०८, जामखेड १४, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ७७८ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २९९, संगमनेर ९५, राहाता ४३, पाथर्डी ३९, नगर ग्रा.५३, श्रीरामपूर ३१, कॅन्टोन्मेंट १३,  नेवासा २३, श्रीगोंदा २४, पारनेर २६, अकोले १९, राहुरी १४, शेवगाव २७,  कोपरगाव ४०, जामखेड ०७, कर्जत २०, मिलिटरी हॉस्पिटल ०५ अशा रुग्णांचा समावेश आहे.

बरे झालेली रुग्ण संख्या: १९९६१

उपचार सुरू असलेले रूग्ण:२४९१

मृत्यू: ३१८

एकूण रूग्ण संख्या:२२७७०

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post