आज ६२६ रुग्णांना डिस्चार्ज, नव्या ९४ बाधितांची रुग्णसंख्येत भर

दिनांक: ०२ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल

आज ६२६ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज

बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता एकोणीस हजाराहून अधिक

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.५० टक्के

आज नव्या ९४ बाधितांची रुग्णसंख्येत भर


अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ६२३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९ हजार १८३ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८६.५० टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण संख्येत ९४ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता २६९३ इतकी झाली आहे.

बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा १०, संगमनेर २७, नगर ग्रामीण १३, अकोले ०१, राहुरी ०१, कोपरगाव ४०, कर्जत ०१, मिलिटरी हॉस्पिटल ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

दरम्यान, आज ६२६ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये, मनपा २२६, संगमनेर १४, राहाता ६८, पाथर्डी १०, नगर ग्रा.३१, श्रीरामपूर ४३, कॅन्टोन्मेंट ०८,  नेवासा १३, श्रीगोंदा ३२, पारनेर २४, अकोले ३३, राहुरी ३६, शेवगाव २५,  कोपरगाव २४, जामखेड ०९, कर्जत २७, मिलिटरी हॉस्पिटल ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.

*बरे झालेली रुग्ण संख्या: १९१८३*

*उपचार सुरू असलेले रूग्ण:२६९३*

*मृत्यू: ३००*

*एकूण रूग्ण संख्या:२२१७६*

(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)

STAY HOME STAY SAFE

प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा

स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या

अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा

खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post