आज ९३३ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, ५७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 दिनांक: २२ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल


आज ९३३ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज


बरे होणाऱ्या रुग्ण संख्येने ओलांडला ३३ हजारांचा टप्पा


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.४६ टक्के


आज ५७ बाधितांची रुग्णसंख्येत भर



अहमदनगर: जिल्ह्यात आज ९३३ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३३ हजार ३८१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.४६ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (सोमवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ५७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३३१६ इतकी झाली आहे.


बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा २८, पाथर्डी १०, नगर ग्रामीण ०१, श्रीगोंदा १२, पारनेर ०३, कोपरगाव ०१ आणि इतर जिल्हा ०२ अशा  रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज ९३३ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा २५०, संगमनेर ५५, राहाता ८७, पाथर्डी ३५, नगर ग्रा. २९, श्रीरामपूर ९६, कॅन्टोन्मेंट ०६, नेवासा ४७, श्रीगोंदा २८, पारनेर ५४, अकोले ३६, राहुरी ३६, शेवगाव ४१, कोपरगाव ४७, जामखेड ४४,

कर्जत ३३ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०९ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या: ३३३८१


उपचार सुरू असलेले रूग्ण:३३१६


मृत्यू:६१९


एकूण रूग्ण संख्या:३७३१६


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


#माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post