आज तब्बल ८७५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज, ४७ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 दिनांक: २५ सप्टेंबर २०२०, दुपारी १२ वाजेपर्यंतचा अहवाल


आज तब्बल ८७५ रुग्णांना मिळाला रुग्णालयातून डिस्चार्ज


आतापर्यंत ३५ हजार ६४४ रुग्ण बरे होऊन परतले घरी


रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३२ टक्के


आज ४७ बाधितांची रुग्णसंख्येत भर




अहमदनगर: जिल्ह्यात आज तब्बल ८७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार ६४४ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८९.३२ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (गुरुवारी) सायंकाळी सहा वाजले पासून आज दुपारी १२ वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ४७ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ३६०१ इतकी झाली आहे.


बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३५, नगर ग्रामीण ०३, कॅंटोन्मेंट ०२, नेवासा ०१, राहुरी ०१, कोपरगाव ०२ कर्जत ०२ आणि इतर जिल्हा ०१ अशा  रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज ८७५ रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये  मनपा २२२, संगमनेर २४, राहाता ७६, पाथर्डी ५०, नगर ग्रा. ५४, श्रीरामपूर ४१, कॅन्टोन्मेंट ०७, नेवासा ८१, श्रीगोंदा ३२, पारनेर ३४, अकोले ४६, राहुरी ४३, शेवगाव ८४, कोपरगाव ३७, जामखेड २४,

कर्जत १७, मिलिटरी हॉस्पिटल ०३ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या:३५६४४


उपचार सुरू असलेले रूग्ण:३६०१


मृत्यू:६६२


एकूण रूग्ण संख्या:३९९०७


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


#माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post