नगर -जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज तर ७३९ बाधितांची रुग्णसंख्येत भर

 दिनांक: २० सप्टेंबर २०२०, रात्री ७ वा

आतापर्यंत ३१ हजार ५७१ रुग्ण बरे होऊन परतले घरी

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८५.६७ टक्के

आज ३८० रुग्णांना डिस्चार्ज तर ७३९ बाधितांची रुग्णसंख्येत भर




अहमदनगर: जिल्ह्यात आज ३८० रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ३१ हजार ५७१ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ८५.६७ टक्के इतके झाले आहे. दरम्यान, काल (शनिवारी)  सायंकाळी सहा वाजले पासून आज सायंकाळी सहा वाजेपर्यंत रूग्ण  संख्येत ७३९ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ४६८५ इतकी झाली आहे.


जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅब मध्ये ८८, खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ३९५ आणि अँटीजेन चाचणीत २५६ रुग्ण बाधीत आढळले.


बाधीत आढळून आलेल्या रुग्णामध्ये मनपा ३९,  संगमनेर ०१, पाथर्डी ०१, नेवासा ०३, श्रीगोंदा ०२, पारनेर ०३, अकोले ०२, राहुरी ०६, शेवगाव २६, जामखेड ०१ आणि मिलिटरी हॉस्पिटल ०४ अशा रुग्णांचा समावेश आहे.


खाजगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या ३९५ रुग्णांची नोंद एकूण रुग्ण संख्येत घेण्यात आली. यामध्ये, मनपा १५१, संगमनेर ०६, राहाता ४०, पाथर्डी १३, नगर ग्रामीण ४८, श्रीरामपुर २२, कॅंटोन्मेंट ०१, नेवासा २५, श्रीगोंदा ०८, पारनेर २०, अकोले ०१, राहुरी ३३, शेवगाव ०७, कोपरगाव ०८, जामखेड ०५ आणि कर्जत ०७ अशा रुग्णांचा समावेश आहे.


अँटीजेन चाचणीत आज २५६ जण बाधित आढळुन आले. यामध्ये,मनपा ४४, संगमनेर ३०, राहाता ०९, नगर ग्रामीण ११,  श्रीरामपूर २८,  नेवासा २९,  श्रीगोंदा १०, पारनेर ०९, राहुरी १०, कोपरगाव २४, जामखेड ३१ आणि कर्जत २१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


दरम्यान, आज ३८० रुग्णांना  बरे झाल्यामुळे डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा ६०, संगमनेर ०८, राहाता ३८, पाथर्डी १६, नगर ग्रा २२, श्रीरामपूर ०४, कॅन्टोन्मेंट ०२, श्रीगोंदा ४१, पारनेर ३२, अकोले १२, राहुरी ३१, शेवगाव ३९, कोपरगाव २४, जामखेड २२, कर्जत २८ आणि इतर जिल्हा ०१ अशा रुग्णांचा समावेश आहे.


बरे झालेली रुग्ण संख्या: ३१५७१


उपचार सुरू असलेले रूग्ण:४६८५


मृत्यू:५९८


एकूण रूग्ण संख्या:३६८५४


(स्त्रोत: नोडल अधिकारी, जिल्हा सामान्य रुग्णालय अहमदनगर)


घराबाहेर पडताना चेहऱ्यावर मास्क अवश्य लावा


प्रतिबंधात्मक नियमांचे पालन करा


स्वतःच्या आणि कुटुंबियांच्या आरोग्याची काळजी घ्या


अधिकृत स्त्रोतांकडून आलेल्या माहितीवरच विश्वास ठेवा


खोटी माहिती पसरवू नका;पसरू देऊ नका


#माझेकुटुंबमाझी_जबाबदारी

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post