सिद्धार्थनगर येथील दफनभुमीसाठी आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून 20 लाख रुपये मंजूर

 सिद्धार्थनगर येथील दफनभुमीसाठी आ.संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून 20 लाख रुपये मंजूर : विश्वस्तांच्यावतीने आभारनगर - सिद्धार्थनगर येथील ख्रिस्ती दफन भुमी विकास कामांकाकरीता आ.संग्राम जगताप यांनी शासनाकडून 20 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. डिसेंबर आ.जगताप यांनी सदर दफनभुमीला भेट देऊन येथील परिसराची पाहणी केली होती. येथील अनेक सुविधांचा अभाव पाहून त्यांनी दफनभुमी न्यास संस्थेच्या पदाधिकार्यांबरोबर चर्चा करुन दफन भुमीतील सुविधांसाठी निधी मिळवून देण्याचे मान्य केले होते. दिलेल्या शद्बाप्रमाणे त्यांनी 20 लाख रुपये नुकतेच उपलब्ध करुन दिलेले आहे. तसे पत्र ट्रस्टचे विश्वस्त जॉन्सन शेक्सपिअर, राजू शिंदे, फ्रॅक्लिन शेक्सपिअर, रेव्ह. पी.जी.मकासरे, एन.बी.जाधव, ऑल्विन शेक्सपिअर, सुनिल सोनावणे, महेंद्र भोसले, मिलिंद भिंगारदिवे यांच्याकडे सुपूर्द केले.

आ.संग्राज जगताप यांच्या प्रयत्नातून मिळालेल्या 20 लाख रुपयांच्या निधीतून दफनभुमीच्या संरक्षक भिंतीचे काम तसेच मुख्य प्रवेशद्वार, पिण्याच्या पाणीची टाकी व इतर सुविधा उपलब्ध होती.

या दफनभुमी ट्रस्टची देखभाल सध्याचे विश्वस्त रेव्ह. पी.जी.मकासरे, जॉन्सन शेक्सपिअर, नंदकिशोर जाधव, फ्रॅक्लिन शेक्सपिअर, सुनिल सोनावणे हे सांभाळत आहेत. आ.संग्राम जगताप यांनी दिलेल्या निधीबद्दल विश्वस्त व  सभासदांनी आभार मानले. तसेच अहमदनगर पहिली मंडळी (कॉग्री.)च्या सर्व सभासदांनी आ.जगताप व विश्वस्तांचे विशेष आभार मानले.

-------

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post