मनसेच्या पाठ पुरवठ्याला यश शहर व जिल्ह्यात 39 हॉस्पिटल मध्ये कोरोणा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळनार मोफत उपचार

मनसेच्या पाठ पुरवठ्याला यश शहर व जिल्ह्यात 39 हॉस्पिटल मध्ये कोरोणा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळनार मोफत उपचार...

 नितीन भुतारेमनसेच्या पाठ पुरवठ्याला यश शहर व जिल्ह्यात 39 हॉस्पिटल मध्ये कोरोणा रुग्णांना महात्मा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत मिळनार मोफत उपचार... नितीन भुतारे

महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने 25 जुलै   रोजी मुख्यमंत्री मंत्री ,आरोग्य मंत्री,पालकमंत्री,जिल्हाधिकारी यांना निवेदन पाठवून जिल्ह्यात कोरोना रुग्णांवर महात्मा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत मोफत उपचार सुरु करा अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यातआली होती त्याची दखल जिल्हाधिकारी साहेबांनी घेतली व 14 ऑगस्ट च्या दिवशी आदेश काढुन शहरातील व जिल्ह्यातील 39 हॉस्पिटलमध्ये महात्मा फुले जण आरोग्य योजने अंतर्गत उपचार सुरु केले. या योजनेमुळे कोरोना रुग्णांना खाजगी हाॅस्पिटल मध्ये होणारा लाखो रुपयांचा खर्च लागणार नाही.  या योजने अंतर्गत उपचारा करीता केशरी रेशन कार्ड असणे बंधनकारक असुन ज्या रुग्णांना श्वसनाचे त्रास तसेच तीव्र लक्षणे असणारे रुग्ण या मध्ये उपचार घेऊ शकतील असा शासनाचा नियम आहे.त्यामूळे सर्व सामान्य जनतेने कोरोना आजारामुळे मोठ्या खर्चाला घाबरुन न जाता महात्मा फुले जन आरोग्य योजनेत मोफत उपचार करावेत. असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने करण्यात आले असुन कोणालाही या योजने अंतर्गत अडचण आल्यास महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या नितीन भुतारे व सचिन डफळ तसेच जिल्ह्यातील  पदाधिकारी यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन मनसेच्या वतीने करण्यात आले असुन पालकमंत्री व जिल्हाधिकारी यांचे आभार महाराष्ट्र नवनिर्मान सेनेच्या वतीने मानण्यात आले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post