विशाल गणपती मंदिरात अथर्वशीर्ष पठण, असंख्य भाविकांचा ऑनलाईन सहभाग...VIDEO
नगर (विक्रम बनकर )- कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सध्या प्रशासनाच्या आवाहनानुसार मंदिरे बंद आहेत. तसेच गणेशोत्सवही साध्या पद्धतीने साजरा करण्यात येत आहे. शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री गणेश मंदिरातही गणेशोत्सवानिमित्त पारंपारिक विविध कार्यक्रम प्रशासनाच्या नियमानुसार होत आहे. आजही सामुहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाचे ऑनलाईन आयोजन करण्यात आले होते. त्यास भाविकांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. अनेक भाविकांनी यात सहभागी होवून अथर्वशिर्ष पठण केले. अथर्वशीर्ष पठण शारदा होशिंग, स्वप्ना बेडेकर, प्रिया खताळ, अमृता बेडेकर, अवंती होशिंग, अबोली सराफ, अनुरिता झगडे आदिंनी केले. या ऑनलाईन फेसबुक, इस्टाग्राम व यु ट्युब द्वारे असंख्य भाविक सहभागी झाले होते.
अथर्वशीर्ष पठण करणार्याच्या भोवती कवच निर्माण करण्याची शक्ती या स्त्रोतात आहे, म्हणून अथर्वशीर्षाच्या पठणाने वाईट शक्तीच्या त्रासापासून आपले रक्षण होते. या स्त्रोत्रात फलश्रुती दिलेली असते, त्यामुळे आत्मज्ञान संपन्न व आपल्या इच्छा मनोकामना फळास येत असल्याने नियमित अथर्वशीर्ष पठण केले जाते.
याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अॅड.अभय आगरकर, उपाध्यक्ष पंडितराव खरपुडे यांनी देवस्थानच्यावतीने गणेशोत्सव काळात होणार्या कार्यक्रमांची माहिती दिली. यावेळी महिलांच्या हस्ते आरती करण्यात आली. उत्सव यशस्वीतेसाठी सर्व ट्रस्टी प्रयत्नशील आहेत.
VIDEO

Post a Comment