इलेक्ट्रॉनिक व्यवहारावर कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावू नका, केंद्राचे बँकांना निर्देश

इलेक्ट्रॉनिक व्यवहारावर कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावू नका, केंद्राचे बँकांना निर्देश


नवी दिल्ली : इलेक्ट्रॉनिक ट्रांजेक्शनवर कोणत्याही प्रकारचे चार्जेस लावू नये, असे निर्देश केंद्रीय अर्थ मंत्रालयाने सर्व बँकांना दिले आहेत. काही बँका युपीआय ट्रांजेक्शनवर चार्जेस लावत असल्याचं समोर आलं आहे. एका विशिष्ट ट्रांजेक्शनच्या मर्यादेनंतर मर्चंट डिस्काउंट रेट्स (एमडीआर) घेतले जात आहेत. मात्र, हे सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्टर टॅक्सेसच्या निर्णयाविरोधात आहे, असं स्पष्ट करण्यात आलं आहे 

सीबीडीटीच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर याबाबत माहिती देण्यात आली आहे. ज्या बँकांनी 1 जानेवारी 2020 नंतर ग्राहकांकडून डिजीटल ट्रांजेक्सनवर चार्जेस लावले असतील त्यांनी ते पैसे ग्राहकांना परत करावे. त्याचबरोबर यापुढे कोणत्याही बँकेने अशाप्रकारचे चार्जेस लावू नये, असं सीबीडीटीकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post