तंबाखूच्या पानांपासून करोना प्रतिबंधक लस?

तंबाखूच्या पानांपासून करोना प्रतिबंधक लस?

मुंबई : कोरोनाचा प्रादुर्भाव जगभरात वाढत असताना काही देशांकडून कोरोनावर लस बनवल्याचा दावा केला जात आहे. आता थायलंडच्या शास्त्रज्ञांनी तंबाखूच्या पानांचा वापर करून कोविड 19 वरील लस विकसित केल्याचा दावा केला आहे. थायलंडच्या चुलालोंगकॉन विद्यापीठाच्या संसर्गजन्य आजारावर विख्यात असणार्‍या डॉक्टरांनी जाहीर केले आहे की, स्थानिक पातळीवर निर्माण तयार करण्यात आलेल्या या लसीची माकडावर करण्यात आलेली प्राथमिक चाचणी यशस्वी झाली आहे.
थाई रेडक्रॉस संसर्गजन्य रोग आरोग्य केंद्राचे प्रमुख डॉ. तिरावत हेमाचुडा यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितलं की, व्हायरसच्या डीएनएचे तंबाखूच्या पानात एकत्रिकरण करून ही नवीन लस तयार केली जाते. त्या डीएनएला झाडाकडून योग्य तो प्रतिसाद मिळतो आणि एका आठवड्यानंतर प्रथिने तयार होतात, असे बँकॉक पोस्टच्या अहवालात म्हटलं आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post