विखे पाटील हॉस्पिटलचे श्रीरामपूरात करोना चाचणी नमुना संकलन केंद्र

विखे पाटील हॉस्पिटलचे श्रीरामपूरात करोना चाचणी नमुना संकलन केंद्र

नगर : डॉ.विखे पाटील मेमोरियल हॉस्पिटलने श्रीरामपुरात करोना चाचणी नमुना संकलन केंद्र सुरु केले आहे. करोनाच्या साथीला अटकाव करण्यासाठी जास्तीत जास्त चाचण्या होण्याची गरज आहे. श्रीरामपुरात रूग्णसंख्या लक्षात घेवून नागरिकांना स्वॅब देणे सोयीचे व्हावे यासाठी विखे पाटील हॉस्पिटलने पुढाकार घेवून स्वॅब संकलन केंद्र सुरु केले आहे. या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी खा.डॉ.सुजय विखे पाटील, माजी सभापती नानासाहेब पवार, दीपक पटारे, पंचायत समिती सभापती संगिता शिंदे, जिल्हा परिषद सदस्य शरद नवले, डॉ.प्रकाश चित्ते, मुक्ता शहा, केतन खोरे, प्रांताधिकारी अनिल पवार, तहसीलदार प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post