मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचा शुभारंभ

मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचा शुभारंभ
युवकांनी नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे  : आ. संग्राम जगताप

नगर : युवकांनी शिक्षण पूर्ण घेतल्यानंतर नोकरीच्या मागे न लागता व्यवसायाकडे वळावे. स्वयंरोजगाराची
विविध साधने स्वतःच्या संकल्पनेतून निर्माण करावी. भविष्यात नोकऱ्यांवर अवलंबून न राहता स्वतः इतरांना रोजगार निर्माण करुन देण्याचे ध्येय व त्यासाठी अपार कष्ट करण्याची तयारी तरुणांनी ठेवावी.व्यवसाय करीत असताना जिद्द, चिकाटी, प्रामाणिकपणा व कष्टाच्या बळावर व्यवसाय द्रिगुणीत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. ग्राहकांचा विश्वास संपादन करुन व्यवसायात भरभराटी आणावी. नालेगावमधील गाडगीळ पटांगणसमोरील मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचे उद्घाटन प्रसंगी आ. संग्राम जगताप बोलत होते. 
नालेगावमधील गाडगीळ पटांगणसमोरील मुदगल अमृततुल्य चहा सेंटरचे उद्घाटन आ. संग्राम जगताप यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी नगरसेवक दत्ता मुदगल, बाबासाहेब मुदगल, माजी नगरसेविका मथुरा मुदगल, माजी नगरसेविका सुनित मुदगल, नगरसेवक सचिन शिंदे, अप्पा नळकांडे, अजय चितळे, आनंद वायकर, मनोज शिंदे, वैभव वाघ, संचालक सर्वार्थ मुदगल आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post